आरती डोगरा जिल्हाधिकारी.jpg
आरती डोगरा जिल्हाधिकारी.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

उंचीवर जाऊ नका...अजमेरच्या 'या' आहेत कलेक्टर

वृत्तसंस्था

पुणे : समाजातील काही नागरिक तिला पाहिल्यानंतर हसायचे..तिची चेष्टा, खिल्ली उडवायचे.. पण ती कधीचं नाउमेद झाली नाही. ही मुलगी एक ओझे आहे, आपण तिला मारण्यापेक्षा तिची काळजी का घेत आहात, असे काही लोकांनी तिच्या पालकांना सांगितले. परंतु तिच्या आई-वडीलांनी तिची खूप काळजी घेतली. तिला चांगले शिक्षण देऊन सक्षम केलं. ती आज आयएएस अधिकारी बनली आहे. ही कहानी आहे राजस्थानमधील अजमेरच्या जिल्हाधिकारी आरती डोगरा यांची. त्यांची उंची फक्त 3 फूट 6 इंच आहे. 

शारीरिक आव्हानाना सामोरे जाताना आरती डोगरा यांनी अनेक अपमान सहन केले. आज त्या ज्या पदावर आहेत, त्यांच्या संघर्षाला सलाम करावा, असं प्रत्येकाला वाटतं. शरीराने लहान असल्या तरी आरती डोगरा यांनी फार मोठे यशाचं शिखर गाठलं आहे. आरती डोगरा या मुळच्या उत्तराखंड येथील. त्यांचा जन्म देहराडून येथे झाला. त्याचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा सैन्यात अधिकारी आहेत आणि आई कुमकुम या एका शाळेत प्राचार्य आहेत. 

आरतीच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की त्यांची मुलगी सामान्य शाळेत शिकू शकणार नाही. सोसायटीतील लोकही म्हणायला लागले की ही मुलगी असामान्य आहे. पण त्याच्या पालकांनी त्याला सामान्य शाळेत ठेवले. लोकांनी काहीही म्हटले तरीही त्यांच्या पालकांनी दुसर्‍या मुलाचा विचारही केला नाही. 


ते म्हणाले की माझी एकुलती एक मुलगी आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. लहानपणापासूनच शारीरिक भेदभावाशी आरतीं यांना सामना करावा लागला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आरतीने पालकांचे स्वप्न पूर्ण केलं अन् ती आयएएस अधिकारी बनली. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) पास व्हायचेच, आरतींचं स्वप्न होतं. त्यांनी ते पूर्ण केलं. 

आरतीचे शिक्षण देहराडूनच्या वेलहॅम गर्ल्स स्कूलमध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्या देहराडूनला आल्या. त्यांनी देहराडूनच्या डीएम आयएएस मनीषा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आरती यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली. आरती त्यांच्याकडून इतकी प्रेरित झाली की त्यांच्यात आयएएसची आवड देखील वाढली. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले.  आपल्या पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा व मुलाखतीत ही आरती यांनी सर्वांना मागे टाकले. आरती डोगरा यांनी यांनी आपल्या यशातून हे सिद्ध केले की कोणीही आपल्याला कितीही बोललं तरी आपण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण हवं ते यशाचं शिखरं गाठू शकतो. 

आरती 2006 बॅचची आयएएस अधिकारी आहे. सध्या त्यांची राजस्थानमधील अजमेरच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी एसडीएम अजमेर या पदावरही काम केलं आहे.  डोगरा यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारी आरती ही पहिली महिला आयएएस अधिकारी होती. बुन्को बिकानो नावाची मोहीम त्यांनी सुरू केली.
 

राजस्थानच्या बीकानेर आणि बूंदी जिल्ह्यातही त्यांनी जिल्हाधिकारीपदाची धुरा सांभाळली आहे. याआधीही त्यांनी डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली होती.  बीकानेरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी बँको बिकानो नावाची मोहीम सुरू केली. यामध्ये लोकांना उघड्यावर शौच करू नये यासाठी प्रेरित केले गेले. यासाठी प्रशासन सकाळी गावात जायचे आणि लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून रोखत असे. गावातून पक्की शौचालये बांधली गेली. मोबाईल सॉफ्टवेअरद्वारे त्याचे परीक्षण केले गेले. 195 ग्रामपंचायतीपर्यंत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. आरती यांच्या कामांचे कैातुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.  
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT